जर तुम्हाला स्पर्मच्या कमी संख्येबद्दल काळजी वाटत असेल, तर हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की हा मार्गाचा शेवट नाही. निरोगी स्पर्म काउंट पुरुष प्रजननक्षमतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, कारण यामुळे अंड्याचे फलित होण्याची शक्यता वाढते. मात्र, तुमचे स्पर्म काउंट सरासरीपेक्षा कमी असले तरीही, स्पर्मचे उत्पादन वाढवण्याचे आणि प्रजनन क्षमता सुधारण्याचे नैसर्गिक मार्ग आहेत. खरं तर, सुमारे 15% जोडप्यांना वंध्यत्वाचा अनुभव येतो आणि स्पर्म काउंट सारखे पुरुष घटक यापैकी जवळजवळ 50% प्रकरणांमध्ये योगदान देतात. चांगली बातमी अशी आहे की जीवनशैलीतील बदल आणि वैद्यकीय सल्ल्याने, अनेक पुरुष त्यांच्या स्पर्मच्या गुणवत्तेत आणि गर्भधारणेच्या शक्यतांमध्ये लक्षणीय सुधारणा पाहतात. या लेखात, आम्ही स्पर्मचा काउंट आणि जाडी नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी काही पुराव्या-आधारित पद्धतींवर चर्चा करू.
स्पर्म काउंट समजून घेणे
स्पर्म काउंट वाढवण्याचे मार्ग जाणून घेण्यापूर्वी, स्पर्म काउंट सामान्यतः किती असते ते समजून घेऊया. जागतिक आरोग्य संघटने (WHO) नुसार, सामान्य स्पर्म काउंट 15 ते 200 दशलक्ष प्रति मिलीलीटर स्पर्ममागे असते. या थ्रेशोल्डच्या खाली असलेली संख्या कमी मानली जाते आणि ऑलिगोस्पर्मिया म्हणून निदान केले जाऊ शकते.
गर्भधारणेसाठी लागणारे स्पर्म काउंट
यशस्वी गर्भधारणेसाठी, किमान 15 दशलक्ष प्रति मिलीलीटर स्पर्म काउंट सामान्यत: आवश्यक मानले जाते. अधिक स्पर्म काउंट सामान्यतः गर्भधारणेची शक्यता वाढवत असले तरी, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की शक्यता कमी असली तरी कमी संख्येसह देखील गर्भधारणा शक्य आहे.
स्पर्म काउंट कमी होण्याची चिन्हे
कमी स्पर्म काउंट दर्शवू शकणारी काही चिन्हे (वैद्यकीयदृष्ट्या ऑलिगोस्पर्मिया म्हणून ओळखली जाते) यांचा समावेश होतो:
- गर्भधारणा करण्यात अडचण
-
अंडकोषांमध्ये सूज किंवा वेदना
-
चेहऱ्यावरील किंवा शरीरावरील केस कमी होणे
तुम्हाला यापैकी कोणतीही चिन्हे दिसल्यास, तुमच्या स्पर्म काउंट कमी आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
स्पर्म काउंट कमी होण्याची कारणे
प्रभावी उपचारांसाठी स्पर्म काउंट कमी होण्याची कारणे समजून घेणे आवश्यक आहे. या स्थितीत अनेक घटक योगदान देऊ शकतात:
-
हार्मोनल इम्बॅलन्स: हायपोथालेमस, पिट्यूटरी ग्रंथी किंवा अंडकोषातील समस्या स्पर्मच्या निर्मितीसाठी आवश्यक हार्मोन्सच्या पातळीमध्ये व्यत्यय आणू शकतात.
-
अनुवांशिक घटक: क्रोमोसोमल एबनॉर्मलिटीज हे टेस्टिच्या कार्यावर परिणाम करू शकतात आणि अशाने स्पर्मची कमी निर्मिती होऊ शकतात.
-
वैद्यकीय परिस्थिती: मधुमेह, सिस्टिक फायब्रोसिस किंवा गालगुंड यांसारख्या संसर्गामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
-
पर्यावरणीय घटक: कीटकनाशके, जड धातू आणि रेडिएशन यांसारख्या टॉक्सिन्सच्या संपर्कात आल्याने स्पर्मच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो.
-
जीवनशैलीची निवड:
-
लठ्ठपणा: शरीराचे जास्त वजन हार्मोनल बदलांशी जोडलेले आहे, ज्यामुळे स्पर्मचे उत्पादन कमी होऊ शकते.
-
धूम्रपान: तंबाखूचा वापर कमी स्पर्म काउंट आणि खराब स्पर्मच्या गुणवत्तेशी संबंधित आहे.
-
अल्कोहोल आणि अंमली पदार्थांचा वापर: मद्यपान आणि गांजा व ॲनाबॉलिक स्टिरॉइड्सच्या अतिसेवनाचा प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.
-
अति उष्णता: सौना, गरम पाण्याने आंघोळ किंवा घट्ट-फिटिंग अंडरवेअरचा वारंवार वापर केल्याने स्क्रोटल तापमान वाढू शकते आणि स्पर्मची निर्मिती बिघडू शकते.
-
-
वय: पुरुष वृद्धापकाळापर्यंत फर्टाईल राहू शकत असले तरीही टेस्टोस्टेरॉनची पातळी साधारणपणे 40 वर्षानंतर कमी होते, ज्यामुळे स्पर्मच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
स्पर्म काउंट वाढवण्याचे नैसर्गिक मार्ग
येथे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही स्पर्म काउंट नैसर्गिकरित्या वाढवू शकता:
1. निरोगी आहार ठेवा:
सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् (SFA) आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् (PUFA) किंवा असंतुलित ओमेगा-6/ओमेगा-3 PUFA प्रमाण असलेले आहार टाळा, कारण ते स्पर्मच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम करू शकतात. त्याऐवजी, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्सने समृध्द संतुलित आहाराचे लक्ष्य ठेवा. याने स्पर्मचे आरोग्य आणि गुणवत्ता लक्षणीयरित्या वाढवू शकते. काही फायदेशीर पदार्थांमध्ये पुढील समाविष्ट आहे:
- फळे आणि भाज्या: बेरी, पालक आणि ब्रोकोलीमध्ये अँटीऑक्सिडंट्स जास्त असतात.
- नट आणि सीड्स: अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया आवश्यक फॅटी ऍसिड प्रदान करतात.
- लीन प्रोटिन्स: रावससारखे मासे आणि चिकन संपूर्ण आरोग्यास पूरक ठरतात.
2. पूरक आहार घ्या:
झिंक, जीवनसत्त्वे आणि कोएन्झाइम Q10 सारखे काही पूरक पदार्थ स्पर्मची गुणवत्ता आणि संख्या सुधारण्यास मदत करू शकतात, विशेषत: पोषक तत्वांची कमतरता असलेल्या पुरुषांसाठी.
3. नियमित व्यायाम करा:
मध्यम-तीव्रतेच्या शारीरिक क्रियाकलापांमध्ये गुंतल्याने निरोगी वजन राखण्यात मदत होते आणि स्पर्मच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते. मात्र, लक्षात घ्या की संशोधनात असेही सूचित होते की तीव्र शारीरिक प्रशिक्षण स्पर्मच्या मोबिलिटी (स्पर्म सेल्सची पुढे जाण्याची क्षमता), मॉर्फोलॉजी (स्पर्म सेल्सचे शारीरिक स्वरूप आणि आकार) आणि कॉन्सन्ट्रेशन (प्रति मिलीलीटर स्पर्मपेशींची संख्या) वर नकारात्मक परिणाम करू शकते. म्हणून, संयम महत्वाचा आहे.
4. तणाव व्यवस्थापित करा:
उच्च तणाव पातळीमुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होऊ शकतो आणि स्पर्मच्या विकासासाठी आवश्यक हार्मोन उत्पादनावर नकारात्मक परिणाम होतो. ध्यान, योग किंवा डीप ब्रीदिंगचे व्यायाम यासारख्या तंत्रांमुळे ताण कमी होण्यास मदत होते, संभाव्यत: प्रजनन क्षमता सुधारते.
5. हानिकारक पदार्थ टाळा:
धूम्रपान सोडणे आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादित करणे स्पर्मची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारू शकते. दोन्ही पदार्थ स्पर्म काउंट आणि गतिशीलता कमी करण्याशी जोडलेले आहेत. याव्यतिरिक्त, गांजा आणि ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स सारखी ड्रग्सही कटाक्षाने टाळायला हवी.
6. पुरेशी झोप घ्या:
एकंदर आरोग्य आणि हार्मोनल समतोल राखण्यासाठी प्रति रात्र 7-8 तास शांत झोपेचे लक्ष्य ठेवा. खराब झोपेमुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी बिघडू शकते आणि प्रजनन क्षमता कमी होते.
7. उष्णता एक्सपोजर मर्यादित करा:
जास्त उष्णता स्क्रोटल तापमान वाढवू शकते आणि स्पर्मच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम करू शकते. म्हणून, जास्त काळ हॉट बाथ किंवा सौना टाळा. याव्यतिरिक्त, उष्णतेचा दीर्घकाळ संपर्क टाळण्यासाठी मांडीवर लॅपटॉप किंवा सेल फोन ठेवू नका.
8. सैल, हवा खिळवत ठेवणारी अंडरवेअर घाला:
टेस्टिस शरीराच्या मुख्य तापमानापेक्षा 2°C कमी असलेल्या तापमानावर योग्यरित्या कार्य करतात. घट्ट-फिटिंग अंडरवेअर आणि पँट स्क्रोटल तापमान वाढवू शकतात. ते स्पर्म आणि टेस्टोस्टेरॉनच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम करतात. म्हणून, सैल, हवा खिळवत ठेवणारे कापड निवडा जे स्पर्मच्या आरोग्यासाठी इष्टतम तापमान राखण्यास मदत करतात.
9. पर्यावरणीय विषाच्या संपर्कात मर्यादा घाला:
कीटकनाशके, प्लास्टिक आणि स्वच्छता उत्पादनांमध्ये आढळणारी काही रसायने आणि विषारी पदार्थ स्पर्मच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम करू शकतात. सेंद्रिय उत्पादने निवडून, नैसर्गिक साफसफाईची उत्पादने वापरून आणि प्लास्टिकचे कंटेनर टाळून तुमचा संपर्क कमी करा.
10. तब्येतीला जपा:
काही वैद्यकीय परिस्थिती, जसे की व्हॅरिकोसेल (अंडकोषातील वाढलेल्या नसा), संक्रमण किंवा हार्मोनल इम्बॅलन्स, स्पर्म काउंट कमी होण्यास कारणीभूत ठरू शकते. तुम्हाला यातील कुठल्याही समस्येचा संशय असल्यास, फर्टिलिटी स्पेशालिस्टचा सल्ला घ्या जे समस्येचे योग्य निदान आणि उपचार करण्यात मदत करू शकेल.
स्पर्मची जाडी कशी वाढवायची?
स्पर्मची जाडी सुधारण्यासाठी, हायड्रेशन आणि पोषण यावर लक्ष केंद्रित करा. चांगले हायड्रेटेड शरीर उत्तम दर्जाचे वीर्य तयार करते. याव्यतिरिक्त, झिंक (ऑयस्टर सारखे) पोषक अन्न सेवन केल्याने वीर्य जाडी वाढण्यास मदत होते.
एका रात्रीत स्पर्मची मात्रा कशी वाढवायची?
स्पर्मचे मूल्यांकन करण्यासाठी जात असाल तर एका रात्रीत लक्षणीय बदल होण्याची शक्यता नसली तरी तुम्ही इजॅक्युलेशन करण्यापूर्वी हायड्रेटेड राहून व अल्कोहोल किंवा ड्रग्स टाळून तुमची स्थिती अनुकूल करू शकता. येथे काही टिप्स आहेत:
- आदल्या दिवशी भरपूर पाणी प्या.
- पचायला जड जाईल असे जेवण टाळा ज्यामुळे आळस येऊ शकतो.
- शरीराचे इष्टतम कार्य सुनिश्चित करण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या.
- स्पर्मची गुणवत्ता कशी सुधारायची?
स्पर्मची गुणवत्ता वाढवण्यासाठी:
- आवश्यक पोषक तत्वांसह संतुलित आहार ठेवा.
- लूज-फिटिंग अंडरवेअर परिधान करून टेस्टिस जास्त गरम करणे टाळा.
- पर्यावरणीय विषाच्या (उदा. कीटकनाशके) प्रदर्शनास मर्यादित करा.
स्पर्मच्या आरोग्यावर आहाराचा प्रभाव
तुम्हाला माहित आहे का की जे पुरुष ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् समृद्ध आहार घेतात त्यांच्या स्पर्म काउंट 50% पर्यंत वाढू शकते? रावस, अक्रोड आणि फ्लॅक्स सीड्स हे ओमेगा-३ चे उत्कृष्ट स्रोत आहेत, जे रक्त प्रवाह आणि हार्मोन्सची पातळी सुधारण्यासाठी ओळखले जातात, शेवटी स्पर्मचे उत्पादन वाढवतात.
इष्टतम स्पर्म उत्पादनासाठी प्रो टीप
झिंक महत्त्वाचा आहे: टेस्टोस्टेरॉन उत्पादन आणि एकूण रिप्रोडक्टिव्ह आरोग्यामध्ये झिंक महत्त्वाची भूमिका बजावते. पुरुषांनी दररोज कमीत कमी 11 मिलीग्रॅम झिंकचे लक्ष्य ठेवले पाहिजे. झिंक जास्त असलेल्या पदार्थांमध्ये ऑयस्टर, भोपळ्याच्या बिया आणि मसूर यांचा समावेश होतो. आहारात त्यांचा समावेश केल्याने स्पर्मची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही लक्षणीयरित्या वाढू शकतात.
पाणी प्यायल्याने स्पर्म काउंट वाढते का?
पिण्याचे पाणी विशेषत: स्पर्म काउंट वाढवते याचा कोणताही थेट पुरावा नसला तरी, प्रजनन आरोग्यासह संपूर्ण आरोग्यासाठी योग्य हायड्रेशन आवश्यक आहे. दिवसभर पाणी पिऊन चांगले हायड्रेटेड राहणे आणि साखरयुक्त पेये टाळणे इष्टतम स्पर्म उत्पादनास समर्थन देऊ शकते.
शून्य स्पर्म काउंट: कसे वाढवायचे
शून्य स्पर्म काउंट (अझोस्पर्मिया) ही एक गंभीर स्थिती आहे ज्यासाठी वैद्यकीय मूल्यांकन आवश्यक आहे. उपचार पर्यायांमध्ये हे समाविष्ट असू शकते:
-
हार्मोनल थेरपी
-
शारीरिक समस्या सुधारण्यासाठी शस्त्रक्रिया
-
इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) सह इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) सारखे सहाय्यक रिप्रोडक्टीव्ह तंत्रज्ञान
वैयक्तिक उपचार पर्यायांसाठी पुरुष फर्टिलिटीमध्ये तज्ञ असलेल्या आरोग्य सेवा प्रदात्याशी सल्लामसलत करणे महत्त्वाचे आहे.
थोडक्यात
स्पर्म काउंट आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी एक समग्र दृष्टीकोन समाविष्ट आहे ज्यामध्ये आहारातील बदल, नियमित व्यायाम, तणाव व्यवस्थापन आणि हानिकारक पदार्थ टाळणे समाविष्ट आहे. या पद्धतींचा अवलंब करून, तुम्ही निरोगी स्पर्म उत्पादनास समर्थन देऊ शकता आणि तुमची एकूण प्रजनन क्षमता सुधारू शकता.
लक्षात ठेवा, प्रत्येकाचा पालकत्वाचा प्रवास वेगळा असतो. योग्य ज्ञान आणि समर्थनासह, तुम्ही तुमची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आणि तुमच्या गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी सक्रिय पावले उचलू शकता.
तज्ञाकडून एक शब्द
जेव्हा तुम्हाला प्रजनन विषयक आव्हानांचा सामना करावा लागतो तेव्हा भारावून जाणे आणि चिंता वाटणे साहजिक आहे. परंतु हे जाणून घ्या की तुम्ही एकटे नाही आहात. अनेक पुरुष यातून जात असून आता भरपूर समर्थन उपलब्ध आहे. तुमच्या डॉक्टरांशी, फर्टिलिटी स्पेशालिस्ट किंवा कौन्सेलरशी बोला. ते तुम्हाला तुमचे पर्याय समजून घेण्यात आणि या कठीण काळात नेव्हिगेट करण्यात मदत करू शकतात. ~ दीपिका मिश्रा
Leave a Reply